इ. स. १९४६ साली स्थापन करण्यात आलेली सेंट फिलोमिना मराठी प्रायमरी स्कूल ही शाळा एक ख्रिश्चन कॅथोलिक आपल्संख्यांक शाळा असून ती महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा आहे. येथे बालवाडी ते 4 थी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत केवळ ख्रिश्चन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर इतर सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जातो. संस्थेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व धर्मियांच्या धार्मिक श्रद्धेचा आदर करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. वेगवेगळ्या स्तरातील, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही शाळा स्थापन केली गेली.
आमच्या शाळेत मूल्यांचे पालन पोषण करून, शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देऊन आणि जबाबदार कृतीला प्रेरणा देऊन आध्यात्मिक आणि बौद्धिक विकासाला प्राधान्य देतो.
याव्यतिरिक्त, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याची आवड जोपासली जाते. विद्यार्थ्यांना कौतुक, समृद्धी आणि आनंदासाठी सांस्कृतिक अनुभव दिले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी अनुकूल असे उत्तेजक वातावरण प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.


