विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या उज्ज्वल यशाने देशाला व जगाला आपली ओळख करवून देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला जातो व त्यांना घडविले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याचा नैतिक, मानसिक, शारीरिक व भावनिक विकास करणे हे आमचे ध्येय आहे. मूल्य संवर्धन व अध्यात्मिक ज्ञानाने विद्यार्थ्यांना परिपूर्ण करून त्यांचे जीवन प्रकाशित करणे व त्यांना देशाचा सुयोग्य नागरिक बनविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येथे शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करून निरनिराळ्या स्पर्धा घेतल्या जातात. उपक्रम राबविले जातात. यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाते.


